

FDA Action On Blinkit
ESakal
मुंबई : ऑनलाइन किराणा सामान वितरण करणाऱ्या 'ब्लिंक ईट'शी संबंधित अन्नसाठवण केंद्रात अन्नसुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या तपासणीत गोदामात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव, खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक तसेच मुदतबाह्य आणि खराब खाद्यपदार्थ आढळून आले. या गंभीर त्रुटींची दखल घेत 'एफडीए'ने ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे.