FDA Action: एफडीएची मोठी कारवाई! ८ लाख किलो अन्नसाठा जप्त; दिवाळीपर्यंत विशेष मोहीम सुरूच

FDA Special campaign For Diwali Festival: एफडीएने भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नसाठ्याविरोधात कारवाई केली आहे. एफडीएने कारवाईत आठ लाख किलो अन्नसाठा जप्त केला आहे.
FDA Action
FDA ActionESakal
Updated on

मुंबई : ‘सण महाराष्ट्राचा - संकल्प अन्नसुरक्षेचा’ अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. ११ ऑगस्ट ते १२ ऑक्टोबर या कालावधीत घेतलेल्या तपासणी मोहिमेत दूध, खाद्यतेल, तूप, खवा-मावा, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर आणि इतर अन्नपदार्थांचे एकूण ४,६७६ नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले. त्यापैकी ९१८ नमुने प्रमाणित, ५१ कमी दर्जाचे, १६ असुरक्षित आणि आठ मिथ्याछाप (भ्रामक लेबल असलेले) आढळले. संशयावरून ८ लाख ३ हजार ९४२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, अहवालांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही मोहीम दिवाळीपर्यंत म्हणजे २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com