गणेश प्रसादावर 'एफडीए'ची नजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

मुंबई - सार्वजनिक उत्सवांमध्ये खराब आणि बनावट मावा बाजारात विक्रीला येत असल्याने अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) सतर्क झाले आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी एफडीएने माव्यापासून बनवलेल्या प्रसादावर करडी नजर ठेवली आहे.

या वेळी अन्नसुरक्षा, स्वच्छतेच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती "एफडीए'च्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी दिली. उत्सवात पेढे आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याचे डॉ. दराडे यांनी सांगितले. याबाबतच्या तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक-1800222365.

Web Title: FDA watch on Ganesh Prasad