कोरोनाच्या भीतीने केळवे बीचवर शुकशुकाट

ok
रविवार, 15 मार्च 2020

पालघर ः कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटकांनी केळवे बीच येथील न्याहरी भाकरी निवासी केंद्रांमध्ये केलेली आगाऊ बुकिंग रद्द केल्याने येथील शेकडो उद्योग-धंद्यांवर गदा आली ोआहे. यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर शुकशुकाट दिसत आहे.

पालघर ः कोरोनाच्या भीतीमुळे पर्यटकांनी केळवे बीच येथील न्याहरी भाकरी निवासी केंद्रांमध्ये केलेली आगाऊ बुकिंग रद्द केल्याने येथील शेकडो उद्योग-धंद्यांवर गदा आली ोआहे. यावर अवलंबून असणाऱ्या मजुरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे किनाऱ्यावर शुकशुकाट दिसत आहे.

कोरोना रोखण्यासाठी मुंबईत जमावबंदी लागू

केळवे बीच हे पर्यटन केंद्र मुंबई आणि गुजरातमधील वापी, सुरत यांना जवळ असल्याने शनिवारी आणि रविवारी, अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येतात. या पर्यटकांच्या सोईसाठी येथील तरुण शेतकरी, मच्छीमार आणि इतर समाजातील नागरिकांनी सरकारमान्य न्याहरी भाकरी निवासी केंद्रे उभारली आहेत.

ठाण्यातील कोरोना विलगीकरण केंद्राला नागरिकांचा विरोध

या केंद्रांमध्ये घरगुती जेवण, निवास आदी सोई पर्यटकांना दिल्या जातात. मांसाहारीसाठी चिकन, मटण, मासे, तसेच शाकाहारी जेवणही पर्यटकांच्या मागणीप्रमाणे दिले जाते. याशिवाय या भव्य समुद्रकिनाऱ्यावर सुरुची बाग असल्याने निसर्गसंपन्न केळवे बीचवर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मार्च-एप्रिलसाठी काही पर्यटकांनी केलेली बुकिंग रद्द केल्याने ही केंद्र बंद पडली आहेत.

केळवे पर्यटन केंद्रात एकूण ६० न्याहारी भाकरी निवासी केंद्रे सरकारमान्य आहेत, तर इतर घरगुती व बचत गटांच्या महिला जेवणाची सोय करतात. सध्या अचानक पर्यटक बंद झाल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच केळवे बीचवर केळ्याची भाजी, ताडगोळे, शहाळी, सुकी मासळी विक्रीसाठी महिला मोठ्या संख्येने लहान-मोठी दुकाने लावतात. त्यांनाही फटका बसला असून या सर्वांचा व्यवसाय बुडाला आहे. 

केळवेतील बहुसंख्य आदिवासी महिला न्याहरी भाकरी निवासी केंद्रांवर मजुरीची कामे करतात. केंद्रे बंद झाल्याने त्यांच्यावरही उपासमारीची पाळी आली असून सरकारने भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

सरकारकडून मदतीची अपेक्षा
कोरोनाच्या भीतीमुळे केळवे बीचवरील न्याहारी भाकरी निवासी केंद्रातील केलेली बुकिंग पर्यटकानी रद्द केल्याने व्यवसाय बुडाला आहे. शेती परवडत नाही, म्हणून पर्यटकांसाठी सरकारमान्य न्याहारी भाकरी निवासी केंद्रे स्थापन केली; मात्र याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याने व्यवसायाला फटका बसला आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे कार्यवाह संजय घरत यांनी केली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of corona Travelers Cancellation of booking in Kelwe beach near Palghar