महाडमध्ये ठायी ठायी विंचू

महाडमध्ये ठायी ठायी विंचू

महाड : अवेळी पावसामुळे त्रस्त झालेले महाड तालुक्‍यातील शेतकरी आता विंचूदंशामुळे हतबल झाले आहेत. भातकापणीच्या या हंगामात 40 ते 50 जणांना विंचूदंश झाला आहे. बिरवाडी परिसरात हे प्रमाण अधिक आहे. 

भातरोपे वाढल्यानंतर रानातील विंचू भाताच्या लोंबीवर आश्रय घेतात. बाहेरील उष्ण वातावरणामुळे ते विंचू भातातील गारव्याला थांबून राहतात. भातकापणीदरम्यान ते अनेक वेळा शेतकऱ्याला दंश करतात. यंदा तालुक्‍यातील बिरवाडी विभागात विंचूदंशाचे प्रमाण अधिक आहे. बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिलपासून 146 विंचूदंशाच्या रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. तर पाचाड, विन्हेरे, वरंध, चिंभावे आणि दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रति दिन दोन विंचूदंशाचे रुग्ण दाखल होत आहेत. केवळ भातकापणी काळात म्हणजेच या महिन्यात तालुक्‍यात 40-50 जण विंचूदंशाचे शिकार झालेले आहेत. 

लाल विंचू घातक 
विंचवांच्या जातीमध्ये कोकणात आढळणारी लाल रंगाची जात अतिशय घातक असते. त्याच्या दंशाने माणूस दगावण्याचा धोका अधिक असतो. यावर त्वरित उपाय करणे आवश्‍यक असते. महाडसह विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात आता विंचूदंशाच्या विषावर प्रतिबंध करणारी औषधे उपलब्ध असल्याने अशा दंशाने रुग्ण दगावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 

महाड परिसरात विंचूदंश रुग्णांत वाढ झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधे उपलब्ध आहेत. विंचूदंश झाल्यास वेळ न लावता त्वरित उपचार घ्यावेत. 
- डॉ. आय. यु. बिरादार, तालुका आरोग्य अधिकारी 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com