पोलिसाचे व्हायरल झालेले 'ते' छायाचित्र बनावट

दिनेश चिलप मराठे
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज ठाणे, नवी मुंबईत हिंसक वळण लागले. या आंदोलनादरम्यान एका पोलिसाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. या पोलिसाच्या गणवेशावर बुटाचा छाप दिसत असल्याचे हे छायाचित्र आहे. प्रत्यक्षात हे छायाचित्र एक वर्षापूर्वीचे आहे.

नवी मुंबई आणि ठाणे येथे आंदोलकांनी दगडफेकीला सुरूवात केल्याने पोलिसांनीही लाठीचार्ज केला. नवी मुंबईत तर पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. मात्र पोलिसांना आंदोलक कसे त्रास देत आहेत, हे या छायाचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. व्हॉट्स अॅप, फेसबुकवर हे छायाचित्र व्हायरल झाले. फोटोत दिसणाऱ्या कॉन्स्टेबलला सहानुभूतीही मिळाली. 

हे आहे सत्य... 
हा फोटो 22 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 1.49 वाजता घेतला असल्याची नोंद आहे. फोटोत एक स्कूल बस आणि एक ट्रक दिसत आहेत. यावरून हे छायाचित्र एखाद्या अपघाताचे असण्याची शक्यता आहे. या घटनेदरम्यान, मदतकार्यासाठी म्हणून या पोलिसाचा सहकारी त्याच्या पाठीवर पाय ठेवून एखाद्या उंच जागी चढला असावा. ही शक्यता आहे. मात्र या फोटोचा मराठा आरक्षण आंदोलनाशी कोणताही संबंध नाही हे सत्य आहे.असे मराठा आन्दोलकांचे म्हणणे आहे.

Web Title: feck photo of police with a shoe mark