रिक्षा संघटनेकडून गुणवंत विधार्थांचे सत्कार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

खारघर : विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आपले स्वार्थ साधण्यासाठी सत्कार कार्यक्रम घेवून समाजात आपला प्रसार आणि प्रचार करीत असतात. मात्र खारघर मधील एकता रिक्षा संघटनेने खारघर मधील दीडशे गुणवंत विद्यार्थाचे सत्कार करून नवा पायंडा पडल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमास नगरसेवक अभिमन्यू पाटील,नरेश तोडेकर, गुरुनाथ गायकर, प्रवीण पाटील, माजी उपसरपंच संतोष गायकर, ज्येष्ठ नागरिक तुळशीराम ठाकूर, भाजपचे तालुका चिटणीस दत्ता वर्तेकर,शेकापचे शहर अध्यक्ष संतोष तांबोळी, अड्व्होकट सचिन कांबळे आणि  एकता रिक्षा संघटनेनचे अध्यक्ष केशरीनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

 खारघर परिसरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्या  एकता रिक्षा संघटनेच्या रिक्षा चालकांनी वर्षभर आपल्या रिक्षात प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या दहावी आणि  बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या मुलांचे गुण गौरव कार्यक्रम घेवून नवीन पायंडा पडला. शनिवारी कोपरा गावातील समाज मंदिरात पार पडलेल्या गुण गौरव सोहळ्यास खारघर परिसरातील नागरिक आणि विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी अभिमन्यू पाटील,नरेश तोडेकर आणि गुरुनाथ गायकर या दिघा नगरसेवकांनी सर्व रिक्षा चालकांचे कौतुक करून उपस्थित विद्यार्थांना शिक्षण क्षेत्रात स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत टिकून राहून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या आई वडिलांचे आणि खारघरचे नाव करा असा सल्ला दिला. उपस्थित असलेल्या सर्व विध्यार्थांचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.रिक्षा चालकांनी गुणवंत विध्यार्थांचे सत्कार कार्यक्रम घेवून सत्कार केल्याने अनेक नागरिकांनी रिक्षा चालकांचे आभार मानले.  

.

Web Title: Felicitation of quality students from Rickshaw Association