पोलिस उपायुक्तांकडून डीजे हद्दपार करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना शाबासकी

Felistition of Ganeshotsav Mandals who deported the DJ by The Deputy Mayor of the Police
Felistition of Ganeshotsav Mandals who deported the DJ by The Deputy Mayor of the Police

उल्हासनगर - डिजेच्या मोठया आवाजात गणपतीचे आगमन आणि विसर्जन केले जात होते. या आवाजाने ध्वनीप्रदूषण होत असल्याने डिजे टाळण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देताना गेल्या दोन वर्षापासून गणेशोत्सव मंडळांनी डिजे हद्दपार केले. अशी शाबासकी देताना आगमन व विसर्जन प्रसंगी कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी उल्हासनगरातील गणेशोत्सव मंडळांना केले.

पोलिस-पालिका-उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतीचे आगमन व विसर्जन यासोबतच मंडपांची परवानगी, कायदा व सुव्यवस्था कशा पाळाव्यात, ध्वनिप्रदूषण, अनधिकृत होल्डींग, बॅनर याविषयीची माहिती किंबहूना मार्गदर्शन करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी डिजे हद्दपार करून ध्वनिप्रदूषण टाळणाऱ्या मंडळांना शाबासकी देताना आगमन व विसर्जन वेळी अनुचित घटना घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था राखावी. पोलिसांचे तुम्हाला सहकार्य मिळणार असून तुम्ही सुद्धा पोलिसांच्या अटीशर्ती नियमांचे पालन करावे अशा सूचना दिल्या.

पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी विसर्जनासाठी चार कृत्रिम तलावाची व्यवस्था पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. पीओपी ऐवजी शाडूच्या मूर्ती बसवून प्लॅस्टिक थर्माकोल यांचा वापर करू नये असे मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी ऑनलाइन मंडप परवानगी त्यासाठीची अनामत रकम, भाडे याची माहिती मंडळांना दिली.

गणेशोत्सव मंडळे पोलिसांना सहकार्य करतील.10 फुटाच्या मूर्तींना उल्हासनगरात विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. नदी दूषित होत असल्याने नदीत विसर्जन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पूर्वी हिराघाट मधील वालधुनी नदीत विसर्जन करण्यात येत होते. कल्याणच्या खाडीत विसर्जनास मज्जाव केला जातो. त्यामुळे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, बालाजी खतगावकर यांच्या कालावधीत उल्हास नदीवर गणेश घाट बांधण्यात आला आहे. तिथे दोन वर्षे मूर्तीचे विसर्जन केले गेले होते.हा घाट नदीच्या शेवटी असून त्यानंतर खाडीची सुरवात होते. या नदीवर विसर्जन केल्यास पाणी दूषित होणार नाही. ते पाहता पालिका पोलिसांनी नदीबाबत सकारात्मक विचार करावा यावर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी लक्ष वेधले.

तर जप्ती करून फौजदारी गुन्हा दाखल होणार -
गणेशोत्सवात 80 डिसीबील च्या आत आवाज असावा. अनधिकृत मंडप, बॅनर, होल्डींग, पोस्टर्स नसावे. याचे उल्लंघन करण्यात येत आहे काय? यावर वॉच ठेवण्यासाठी शासनाने समिती नेमली आहे. एखाद्या मंडळाकडून होत असलेल्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येणार व जप्ती करून पर्यावरण कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार. याबाबत उपविभागीय (एसडीओ) अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी गणेशोत्सव मंडळांना जागरूक केले.

यावेळी माजी आमदार कुमार आयलानी, सहाय्यक पोलिस आयुक्त मारुती जगताप, वाहतूक शाखेचे सहाय्यक आयुक्त प्रदिप गोसावी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस, दत्तात्रय पालवे, कल्याणजी घेटे,राजेंद्र कदम, घनश्याम पलंगे, पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विनोद केणे, सहाय्यक आयुक्त अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com