esakal | महिला पोलिस उपनिरीक्षकास मोबाईलवर बोलणे महागात
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा रोड ः पोलिसांकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन.

मिरा रोड ः भाईंदर पश्‍चिम पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मनीषा पाटील यांना गाडीवरून जाताना मोबाईलवर बोलणे महागात पडले असून वाहतूक नियमाच्या उल्लंघनप्रकरणी त्यांना ७०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

महिला पोलिस उपनिरीक्षकास मोबाईलवर बोलणे महागात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड ः भाईंदर पश्‍चिम पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक मनीषा पाटील यांना गाडीवरून जाताना मोबाईलवर बोलणे महागात पडले असून वाहतूक नियमाच्या उल्लंघनप्रकरणी त्यांना ७०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मेट्रोमुळे झाकोळले ठाण्यातील थीम पार्क

सामाजिक कार्यकर्ते सुनील कदम यांनी पोलिस गणवेशात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न वापरणे आदींवरून पाटील यांची पोलिस अधीक्षक, उप-अधीक्षक आणि उप-विभागीय पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.

एमआरआयडीसी बांधणार १० पूल

ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी २७ जानेवारीला  ‘३१ वे रस्ते सुरक्षा अभियान’ कार्यक्रमात अनेकांचा सत्कार केला होता. त्यावेळी पो. अधीक्षक राठोड यांच्या हस्ते वाहतूक नियमांवर आधारित ‘सडक सुरक्षा’ या पुस्तकाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी मिरा-भाईंदरमधील ६ पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. 

वाहतुकीच्या नियमांची माहिती घेऊन त्याचे सर्वांनी पालन करावे, याची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे, असे असतानाही भाईंदर पश्‍चिम पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरिक्षक मनीषा पाटील दुचाकीवरून जात असताना विनाहेल्मेट, मोबाईलवर बोलत असल्याचे आढळल्याने कदम यांनी तक्रार केली होती. त्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.  

महिला पोलिस उपनिरिक्षकाकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी तक्रार येताच आम्ही ७०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
अनिल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक पोलिस

मिरा-भाईंदरमध्ये पोलिस सर्रासपणे वाहतूक नियम तोडताना दिसून येतात. सामान्य नागरिकांवर मात्र त्वरित कारवाई केली जाते. 
सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते

loading image
go to top