

Worli Sea Link suicide case
ESakal
मुंबई : मुंबईच्या वरळी सी-लिंकवर एक धक्कादायक घटना घडली आहे. एका ५१ वर्षीय व्यावसायिकाने टॅक्सी थांबवून समुद्रात उडी मारल्याची घटना समोर आली आहे. मृताची ओळख भावेश नवीनचंद्र माजेठिया, रा. ठाणे, अशी पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मळमळ होत असल्याचे कारण सांगून माजेठिया यांनी टॅक्सी चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले होते. सी-लिंकवर गाडी थांबल्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.