मेट्रो-३ चे ५० टक्के भुयारीकरण

मेट्रो-३ चे ५० टक्के भुयारीकरण

मुंबई - मुंबईची नवीन जीवनवाहिनी म्हणून आकार घेत असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मेट्रो-३ ने अवघ्या १९ महिन्यात ५० टक्के भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. या मार्गासाठी एकूण ५६ किलोमीटरचे भुयारीकरण करायचे असून, ते वेळेत पूर्ण होईल असा विश्‍वास मेट्रो रेल प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ हा मुंबईतीलच नाही, तर भारतातील सर्वात लांब पूर्णतः भुयारी मार्ग आहे. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या आर्थिक राजधानीत या भुयारी मार्गाचे काम करणे फारच अवघड आहे. मात्र, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुरक्षा मानकांचा वापर करण्यात येत आहे. यामुळे कोणताही अपघात न होता केवळ १९ महिन्यांत एकूण ५० टक्के काम पूर्ण करण्यात आले.

एकूण भुयारीकरणापैकी आजवरचा सर्वात मोठा भुयारीकरणाचा टप्पा विद्यानगरी ते विमानतळ (३.९ किमी) हा असून सर्वात लहान सारिपुत नगर ते सीप्झ (५६२ मीटर) हा आहे. २८ किमी भुयारीकरणासाठी एकूण १९,४९५ सेगमेंट रिंग्सचा वापर झाला आहे. एकूण ३३.५ किमीच्या मार्गिकेवरील उर्वरित ५० टक्के भुयारीकरण आणखी १९ टप्प्यांत पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस. के. गुप्ता यांनी दिली. 

टीबीएम्स भूगर्भात उतरवण्यासाठी कफ परेड, इरॉस सिनेमा, आझाद मैदान, सायन्स म्युझियम, सिद्धिविनायक, नयानगर, बीकेसी, विद्यानगरी, पाली मैदान, सारिपुत्रनगर, सहार रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ येथे लाँचिंग शाफ्ट बांधण्यात  आले आहेत.

एकूण १३ टप्पे
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सप्टेंबर २०१७ मध्ये नयानगर लाँचिंग शाफ्टमध्ये कृष्णा-१ हे टीबीएम उतरवल्यानंतर दिनांक ६ नोव्हेंबर २०१७ पासून प्रत्यक्ष भुयारीकरणाला सुरुवात झाली. मुंबईच्या भूगर्भात एकूण १७ टीबीएम्स सध्या कार्यरत आहेत. भुयारीकारणाचा पहिला टप्पा सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला. यानंतर आठ महिन्यात एकूण १२ टप्पे पार पडले आहेत. आतापर्यंत सीप्झ येथे १, सीएसएमआयए-टी २ येथे २, सहार, एमआयडीसी, वरळी आणि आंतरदेशीय विमानतळ येथे प्रत्येकी एक, तर दादर, विद्यानगरी आणि विद्याभवन येथे २ अशा प्रकारे भुयारीकरणाचे एकूण १३ टप्पे पार पडले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी वॉर रूमद्वारे नियमित घेतलेला आढावा, विविध भागीदारी संस्थांचे सहकार्य आणि मुंबईकरांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण करू.
- अश्‍विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com