सुखावणारी बातमी ! पाच दिवसांच्या नवजात बालकाची कोरोनावर मात

सुखावणारी बातमी ! पाच दिवसांच्या नवजात बालकाची कोरोनावर मात

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या केसेस समोर येताना पाहायला मिळतायत. काहींचं घरातील बजेट कोलमडतंय तर काहींच्या घरात सर्वांना कोरोना होतोय. अशीच एक बातमी परवा म्हणजेच १ एप्रिल रोजी मुंबईतून समोर आली होती. बातमी अत्यंत वाईट होती. कारण अवघ्या ३ दिवसांच्या नवजात बालकाला कोरोना झाला आहे अशी ही बातमी होती. मुंबईतील चेंबूरमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाने एका प्रायव्हेट रुग्णालयात ही चाचणी केली होती. यांनतर बाळाला आणि आईला कस्तुरबात जाण्याचा सल्ला गेला होता. 

कस्तुरबात आई आणि बाळासह वडिलांना देखील कस्तुरबात क्वारंटाईन करण्यात आलं होतं. काल या  सर्व तिघांची कोरोना चाचणी करण्यात आली. आई या तिघांचेही रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. आता या तिघांची आज पुन्हा दुसरी कोरोना टेस्ट केली टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान त्यांचा हा रिपोर्टही जर निगेटिव्ह आल्यास या तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

एका आठवड्यात वाढलेत १००० रुग्ण 

जगभरात कोरोनानाने थैमान घातलंय. अशात चीन नंतर इटली, इराण, स्पेन, अमेरिका या देशांमध्ये कोरोनावर मत करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. यापैकी कोणत्याही देशाला अजून कोरोनावर पाहिजे तसं नियंत्रण मिळवण्यात आलं नाहीये. भारतातही कोरोनाचा आकडा वाढतोय पहिला रुग्ण आढळल्यानंतर  ८ आठवड्यांनंतर भारतात १००० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते. अशात अवघ्या एका आठवड्यात हीच १००० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २००० + झालीये. त्यामुळे भारतात कोरोनाचा संसर्ग वाढताना पाहायला मिळतोय. मात्र जगातील उत्तर देशांच्या तुलनेत भारतात कोरोना नियंत्रणात आहे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

fight against corona five days old baby tested negative in kasturba hospital mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com