Inside Story : डॉक्टरांना कोरोनापासून वाचवणाऱ्या PPE घ्या जाणून

Inside Story : डॉक्टरांना कोरोनापासून वाचवणाऱ्या PPE घ्या जाणून

मुंबई : जगभरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. जगभरातील जवळपास ५० हजार नागरिकांचा कोविड १९ मुळे मृत्यू झालाय. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून रुग्णांना कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. Covid19 रुग्णांचा प्राण वाचवताना डॉक्टरांना किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याचीही तेवढीच घ्यावी लागतेय. जगभरात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी PPE सूटचा उपयोग करत आहेत. कोरोनाबाधित व्यतींमुळे डॉक्टरांना किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना होऊ नये म्हणून या सुटची खास निर्मित करण्यात आलीये. आम्ही तुम्हाला याच सुटबद्दल काही माहिती देणार आहोत.

काय आहे या सूटचं पूर्ण नाव:

पीपीई सूट म्हणजे 'पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट'. या सूट खास डॉक्टरांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. जेव्हा डॉक्टर एखादा गंभीर आजार असणाऱ्या रुग्णाचा उपचार करत असतात तेव्हा डॉक्टर या सूटचा उपयोग करतात.  हा सूट केमिकल, रेडियोलॉजिकल, फिझीकल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल, इन्फेक्शन या गोष्टींपासुन बचाव करण्यासाठी वापरला जातो.

काय असतात या सुटच्या विविध लेव्हल्स :

हे सूट ४ वेगवेगळ्या लेव्हलचे असतात. A B C आणि D अशा चार लेव्हलचे हे पीपीई सूट असतात. सध्या कोरोनापासून व्हायरसपासून बचाव करण्यासाठी A लेव्हल सूटचा उपयोग केला जातोय. यात डॉक्टरांच्या केसांपासून तर जोड्यांपर्यंत पूर्ण कव्हरची व्यवस्था केली जाते, ज्यामुळे डॉक्टरांचा कोरोनापासून बचाव होऊ शकतो. 

असा असतो PPE सूट:

पीपीई सुटमध्ये विशेष पध्दतीनं तयार केलेला चष्मा, तोंडाचं मास्क,चेहरा झाकण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची शिल्ड, डोकं झाकण्याचं कव्हर, हँड ग्लव्ह,जोडयांना झाकण्याचं कव्हर आणि शरीराला कव्हर करण्यासाठी सूट अशा काही गोष्टी असतात. हा सूट घालताना डॉक्टरांना या सर्व गोष्टी नीट तपासूनच घालणं महत्वाचं असतं.

या सुटमुळे कसा होतो बचाव:

हा सूट खास डॉक्टरांसाठी डिझाईन केलाय ज्यामध्ये डॉक्टर हा सूट घालून कुठल्याही गंभीर व्हायरसपासून स्वतःचा बचाव करू शकतात. हा सूट डॉक्टरांची रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजेच श्वसन क्रिया चांगली ठेवण्यासाठी देखील मदत करतो. यामुळे डॉक्टरांना कुठल्याही आजाराची लागण होत नाही.

का महत्वाचा आहे हा सूट:

जगभरात कोरोनाचा संसर्ग होतोय. एकमेकांच्या स्पर्शामुळे किंवा कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे जर डॉक्टरांना या रुग्णांवर उपचार करून त्यांना बरं करायचं असेल त्यासोबत स्वतःचेही प्राण वाचवायचे असेल तर हा सूट घालूनच उपचार.  आणि म्हणूनच भारतात देखील PPE किती वापरूनच कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. 

what is corona kit and how ppe kits helps to keep doctors treating covid 19 patients safe 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com