बाथरुमबाहेर नागांचे युद्ध पाहून महिला बिथरली

snake
snake

मुंबई : तुम्ही रात्री बाथरुममधून बाहेर येताना दरवाज्याजवळ विषारी नाग दिसला तर... नकळत त्याच्यावर पाय पडल्यानंतर दरवाज्याजळच दोन नागांचे युद्ध दिसल्यानंतर तुम्ही नाग जाईपर्यंत बाथरुममध्येच बसून राहाल. ही घटना घडली बोरिवलीतील देवीनगर वसाहतीतील उपाध्याय अपार्टमेंटमध्ये. बाथरुमच्या दरवाजाबाहेरच दोन्ही नागांच्या युद्धामुळे चक्क वीस मिनिटे महिला आतमध्येच अडकून राहिली. 

मंगळवारी रात्री बाथरुममध्ये गेलेल्या महिलेच्या पायाजवळ काहीतरी स्पर्श झाला. दरवाजाजवळ पायाखाली वाकून बघितल्यानंतर दोन नागांमध्ये जुंपल्याचे पाहताच त्यांची घाबरगुंडीच उडाली. क्षणार्धात दरवाजा बंद करुन त्यांनी स्वतःला बंद करुन घेतले. बाथरुमधून जोरजोरात किंचाळून त्या महिलेने घरच्यांना बोलावले. तिची किंचाळी एकून घरातील अन्यजणही बाहेर आले. मात्र बाथरुमच्या दरवाज्याजवळच नागांच्या युद्धाचा प्रसंग पाहताच त्यांचीही घाबरगुंडी उडाली. या भागांत सापांचे दर्शन सामान्य असले तरीही घरात नागांचे युद्ध पाहणे असा प्रसंग त्यांनी पहिल्यांदाच पाहिला. याबाबत घरच्यांनी सर्प या प्राणीप्रेमी संस्थेला माहिती दिली. सर्प या संस्थेचे अमित सदके आणि अरविंद कांबळे यांनी दहा मिनिटांतच घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ती महिला आतमध्ये बाथरुममध्येच होती. सर्पच्या दोन्ही स्वयंसेवकांकडून दहा मिनिटांतच दोन्ही सापांना पकडण्यात आले. तोपर्यंत वीस मिनिटे ती महिला बाथरुममध्येच बसून राहिली. हा गोंधळ आटोपल्यानंतर ती महिला बाथरुमबाहेर आली. हा गोंधळ आटोपेपर्यंत रात्रीचे साडेदहा वाजले. 

सापांची संख्या वाढतेय
बोरिवलीत नागांच्या रंगलेल्या युद्धामागे वाढती नागांची संख्या कारणीभूत असल्याची माहिती निसर्गतज्ज्ञ आणि सर्प या संस्थेचे सर्पमित्र चैतन्य कीर यांनी दिली. कच-याच्या समस्येमुळे मुंबईभरात उंदीरांची संख्या वाढतेय. मुंबईत पाणथळ जागाही कमी होत असल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या जागांच्या शोधासाठी मानवी वस्तीजवळ यंदा साप आढळून आलेत. बोरिवलीतील घटना बाथरुमजवळील पाण्याची जागा मिळण्यासाठी दोन नागांमध्ये झाली, असेही कीर म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com