उल्हासनगरात भाजपा नेत्याच्या हॉटेलमध्ये बिलावरून हैदोस

दिनेश गोगी
रविवार, 24 जून 2018

उल्हासनगर : महापालिकेतील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तथा सभागृहनेते जमनादास पुरस्वानी यांच्या हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागण्यावरून चौघांनी हैदोस घालून हाणामारी केल्याची घटना शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली. हि घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. 

जमनादास पुरस्वानी यांच्या शहरात अनेक ठिकाणी वैष्णो नावांची हॉटेल्स असून त्यात पूर्णतः शाकाहारी जेवण मिळते. कॅम्प नं. 2 येथील नेहरू चौक परिसरात वैष्णवी हॉटेल आहे. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जमनादास पुरस्वानी यांचा मुलगा भारत पुरस्वानी काउंटरवर बसले असताना त्यांच्या ओळखीचा मामा उर्फ रमेश व नितीन हे हॉटेलमध्ये आले. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिल्याने भारत यांनी त्यांच्याकडे जेवणाचे पैसे मागितले. त्या दोघांनी बिलाचे पैसे न देता भारत यांना धमकी दिली. त्यावेळी त्या दोघांचेही इतर दोन सहकारी अविनाश व एक इसम त्या हॉटेलमध्ये आले. त्यांनी भारत व त्याचे मित्र राजेश व लखन यांना मारहाण करून शिवीगाळ केली.

तसेच राजेश याच्या गळयातील सोन्याची चैन जबरीने खेचून पळून गेले. या प्रकरणाची तक्रार भारत पुरस्वानी यांनी उल्हासनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने तपास करीत आहेत. जेवणाच्या पैशांवरून हैदोस घालून हाणामारी करणारे तीन दिवसांपासून फरार असून पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी मागणी सभागृनेते जमनादास पुरस्वानी यांनी केली आहे.

Web Title: fight with customer in bjp leader's hotel from ulshasnagar