वज्रेश्वरी - अंबाड़ी येथे दोन गटात हाणामारी

दीपक हीरे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

वज्रेश्वरी : डोंबिवली येथील एक कुटुंब वज्रेश्वरी येथून देव दर्शन करून घरी जात असताना अंबाड़ी नाका येथे साइड मागण्या वरुन झालेल्या वादावरुन दगड फेक होऊन मोठी दंगल सदृश परिस्थिति निर्माण होऊन येथील पोलीस चौकीवर जमावाने दगडफेक केली असल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वज्रेश्वरी : डोंबिवली येथील एक कुटुंब वज्रेश्वरी येथून देव दर्शन करून घरी जात असताना अंबाड़ी नाका येथे साइड मागण्या वरुन झालेल्या वादावरुन दगड फेक होऊन मोठी दंगल सदृश परिस्थिति निर्माण होऊन येथील पोलीस चौकीवर जमावाने दगडफेक केली असल्याची घटना काल रात्री घडली. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

डोंबिवली येथील अमोल अंबादास वकोडे, अजय संजय गुजळ, किशोर पुंडलिक धनगर, अजीन जहाँगीर मुज्जवर हे कुटुंब स्कॉर्पियो गाड़ी घेऊन वज्रेश्वरी येथे देव दर्शनासाठी आले होते, संध्याकाळी घरी डोंबिवली येथे परत असताना अंबाड़ी नाका येथे प्रवासी वाहतूक करणारी गाड़ी रसत्याच्या मधे उभी असल्याने त्याला बाजूला ठकलत शिवीगाळ करत बाजूला नेऊन मारल्याने त्याचा राग सदर टॅक्सी चलकास आला यावेळी अन्य साथीदारांनी हा प्रकार पहाताच ते सर्व जण लोखडी रॉड काठी दगड घेउन येथील पुलाखाली जमाव करून सदर स्कॉर्पियो अडवून दोन्ही गटात तूफान हाणामारी व दगड फेक झाली व शिवीगाळ करत एकमेकांच डोके फोडून गंभीर जखमी केले.

यावेळी सदर स्कॉर्पियो गाडी फोडण्यात आली या घटनेची माहिती मिळताच गणेशपुरी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णत काटकर यांनी घटनास्थळी धाव घेउन दंगल नियंत्रण पथक व स्थानिक पोलीस यांच्या मदतीने परिस्थिति नियंत्रणात आणली.

तसेच पोलीस उप निरीक्षक सचिन ढोले व विशाल वायकर यानी दोन्ही गटाच्या आरोपींना येथील पोलीस चौकीत कोंडून ठेवल्याने अंधाराचा फायदा घेत काही नागरीकांनी येथील पोलीस चौकी वर व परिसरात तूफानदगड फेक केली  व पोलीस विरोधात घोषणा बाजी केली या अचानक झालेल्या प्रकारामुळे येथील दुकानदार व ग्रामस्थ मधे घबराट पसरुन येथील व्यापारानी ताबोडतोब आपली दुकाने बंद केली मात्र दंगल सदृश परिस्थिति निर्माण झाल्याने परिसरात सर्वत्र तनाव पसरला होता या प्रकरणी पंकज सुदाम पाटील भूषण जाधव कल्पेश जाधव व अन्य तीन जण यांच्या सह दोन्ही गटावर गैर कायदा जमाव करून मारहाण करणे म्हणून गणेशपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Web Title: fighting between two groups in wajareshwari