भिवंडी इमारत दूर्घटना! महापालिकेच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करणाऱ्या इमारत मालकाविरोधात गुन्हा दाखल

शरद भसाळे
Monday, 21 September 2020

इमारत कोसळून भीषण दूर्घटना झाली या प्रकरणी इमारतीचे मालक विरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी - भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल नगर या परिसरात आज पहाटे इमारत कोसळून झालेल्या दूर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेने धोकादायक इमारत घोषित करून नोटीस बजावली असताना त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इमारत कोसळून भीषण दूर्घटना झाली या प्रकरणी इमारतीचे मालक विरोधात नारपोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

NCBच्या जबाबात रिया चक्रवतीचे खळबळजनक विधान; सारा अली खानने सुशांतसोबत हेवी डोस घेतल्याचा खुलासा

सय्यद अहमद जिलानी (वय 60 रा.नालापार भिवंडी)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इमारत मालकाचे नांव आहे.शहरातील पटेल नगर या भागात असलेली जिलानी इमारत ही कमकुवत व धोकादायक नागरिकांना राहण्यास योग्य नाही याबाबत भिवंडी महानगरपालिका प्रशासनाने दोन वेळा इमारतीचे मालक सय्यद अहमद जिलानी यांना नोटीस बजावली सदर इमारत अत्यंत कमकुवत झालेली आहे.रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे माहित असून सुद्धा या इमारतीचे मालक यांनी महापालिकेच्या नोटीस इकडे दुर्लक्ष केले तसेच इमारती मधील रहिवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो हे माहित असताना सुद्धा रहिवाशांना रूम खाली करण्यास न लावल्याने सदर जिलानी इमारत ही आज पहाटेच्या सुमारास कोसळली. 

खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर वीस जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी इमारतीचे मालक सय्यद अहमद जिलानी यांच्याविरोधात भा द वि 337,338,304 दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास नारपोली पोलीस ठाण्याचे  पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहे.

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Filed a case in Bhiwandi against the building owner who ignored the notice of the Municipal Corporation