esakal | मुंबईतले ओरबाडून लखनौ-नोएडात सोन्याचा धूर काढणार का? मुख्यमंत्री योगींवर शिवसेनेचा घणाघात
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतले ओरबाडून लखनौ-नोएडात सोन्याचा धूर काढणार का? मुख्यमंत्री योगींवर शिवसेनेचा घणाघात

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून योगी अदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. 

मुंबईतले ओरबाडून लखनौ-नोएडात सोन्याचा धूर काढणार का? मुख्यमंत्री योगींवर शिवसेनेचा घणाघात

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील उद्योजकांची तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली. मुंबईतील चित्रपट उद्योग उत्तरप्रदेशात हलवण्याचा डाव असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून योगी अदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर सडकून टीका करण्यात आली आहे.  

हेही वाचा - शिवडी न्हावाशेवा प्रकल्पासाठी जवळपास एक हजार झाडांचा बळी

मुख्यमंत्री योगी अदित्यानाथ यांच्या दौऱ्यावर शिवसेनेने निशाणा साधला आहे. उत्तरप्रदेशातील गुंडगीरी, खिळखिळी यंत्रणा, बेरोजगारी आदींवर बोट ठेवण्यात आले आहे. यासोबतच योगी यांना भेटणारे अभिनेते अक्षय कुमार यांचाही शिवसेनेने समाचार घेतला आहे. संपूर्ण देश भीकेला लागलेला असताना, मुंबईतले ओरबाडून उत्तरेत सोन्याचा धूर काढणार का? असा संतप्त सवालही शिवसेनेने विचारला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारी मालिका मिर्झापूर आणि उत्तर प्रदेशातील स्थिती सारखीच असल्याची टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

नक्की काय म्हटलेय शिवसेनेच्या मुखपत्रात -

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबई मायानगरीत आगमन झाले असून ते ‘ऑबेरॉय ट्रायडण्ट’च्या समुद्रकिनाऱयावरील मठात निवासाला आहेत. साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. ‘ट्रायडण्ट’च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे.

प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे. योगी महाराज आता सिने उद्योगात उतरणार असल्याने त्यांनी अशा विषयाकडे मनोरंजनाचा भाग म्हणून पाहायला हवे.

हेही वाचा - लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉक डाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत. त्यामुळे मुंबईतले ओरबाडून योगी महाराज लखनौ-नोएडात सोन्याचा धूर कसा काढणार? त्याऐवजी लखनौसाठी एखाद्या द्वारकाधीश श्रीकृष्णाची नेमणूक का करू नये? पण हे द्वारकाधीशही मुंबईतच सापडतात. श्रीकृष्णाने म्हणे त्याचा निष्कांचन मित्र सुदामा याचे मूठभर पोहे खाल्ले आणि त्याच्या बदल्यात सुदाम्याची संपूर्ण नगरीच सोन्याची करून टाकली. अशा श्रीकृष्णाचा शोध घेण्यासाठी योगी महाराज मुंबईत आले. आता त्यांना पोहे कोण खायला घालते ते पाहायला हवे. गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्म सिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे. योगींचा हा विचार चांगलाच आहे.

हेही वाचा - पोस्ट कोविडचा वाढता प्रभाव, ओपीडीत 1500 रूग्ण दाखल

तुम्ही फिल्म सिटी खुशाल उभारा, पण त्यांच्या याच विधानात ‘फिल्म सिटी मुंबईतच का फोफावली, वाढली, बहरली आणि बाहेर का नाही?’ याचे उत्तर दडले आहे. शिवाय फिल्म सिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे. मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते. मुंबईतील ‘अंडरवर्ल्ड’वरही सिनेमे निघालेच होते, पण महाराष्ट्राने ही गुंडगिरी मोडून काढली. ‘मिर्झापूर’मध्ये दाखविलेले.

loading image