दुष्काळी परिस्थितीबाबत 4 मे रोजी अंतिम सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवरील अंतिम सुनावणी 4 मे रोजी घेण्याचे मंगळवारी निश्‍चित करण्यात आले.

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवरील अंतिम सुनावणी 4 मे रोजी घेण्याचे मंगळवारी निश्‍चित करण्यात आले.

देशाच्या आणि राज्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या नियोजनाची अंमलबजावणी सरकारकडून काटेकोरपणे व्हावी, अशी मागणी याचिकादार डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे. जलसंधारण आणि दुष्काळी परिस्थितीबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत असून विविध जिल्ह्यांत काम सुरू झाले आहे, असा दावा सरकारने केला आहे. मात्र सरकारचा दावा फोल असून अद्याप आवश्‍यक ते काम करण्याबाबत सरकार उदासीन आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.

Web Title: final result for drought condition