esakal | अंतिम वर्ष परीक्षेचा पेच सुटणार; विद्यापींठाच्या कुलगुरूंची आज राज्यपालांसोबत बैठक!
sakal

बोलून बातमी शोधा

अंतिम वर्ष परीक्षेचा पेच सुटणार; विद्यापींठाच्या कुलगुरूंची आज राज्यपालांसोबत बैठक!
  • अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी राज्यपाल, कुलगुरूंसोबत बैठक घेतली. उद्या (ता. 3) पुन्हा राज्यपालांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होणार आहे.
  • या बैठकीत परीक्षा कशा घेणार, याबाबतचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या किंवा शुक्रवारी (ता. 4) अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

अंतिम वर्ष परीक्षेचा पेच सुटणार; विद्यापींठाच्या कुलगुरूंची आज राज्यपालांसोबत बैठक!

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात आज उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी राज्यपाल, कुलगुरूंसोबत बैठक घेतली. उद्या (ता. 3) पुन्हा राज्यपालांच्या उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होणार आहे. या बैठकीत परीक्षा कशा घेणार, याबाबतचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या किंवा शुक्रवारी (ता. 4) अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची राजभवनावर भेट घेतली. तसेच परीक्षांबाबत नेमलेल्या समितीसोबत आणि सर्व कुलगुरूंसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी परीक्षेबाबत उद्या किंवा शुक्रवारपर्यंत सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असे पत्रकारांना सांगितले. परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करून केलेली कार्यवाही, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतच्या भावना, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकांची माहिती सामंत यांनी आज राज्यपालांना दिली. या वेळी राज्यपालांनी परीक्षा सहज, सोप्या पद्धतीने कशा घेता येतील, यावर विचार करावा. कुलगुरूंचे काय म्हणणे आहे ते जाणून घ्यावे. समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. 

मोठी बातमी! दहावी बारावी फेरपरीक्षा यंदा लांबणीवर; जाणून घ्या कोणत्या महिन्यात होणार परीक्षा

उद्या दुपारी 4 वाजता पुन्हा राज्यपालांसोबत बैठक होणार आहे. बैठकीनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर समितीचा अहवाल सादर करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र पाठवून राज्यातील कोरोनाची सद्यस्थितीत आणि परीक्षेसंदर्भातील नियोजन कळविण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? 'मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या प्रशासनावर वचक नाही'; मनसेच्या घणाघाती टीका

सीईटी परीक्षा 1 ते 9 ऑक्‍टोबरदरम्यान 
यंदा कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी परीक्षा लांबणीवर गेली आहे. ही परीक्षा 1 ते 9 ऑक्‍टोबर या कालावधीत आयोजित करण्यात येईल. या परीक्षेचे वेळापत्रक उद्या किंवा शुक्रवारी जाहीर केले जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. इंजिनिअरिंग, फार्मसी यासह सीईटी सेलमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा 1 ते 15 ऑक्‍टोबरला आयोजित करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 
------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image