esakal | म्हणून नवी मुंबईचा कारभार प्रशासकाच्या हाती
sakal

बोलून बातमी शोधा

म्हणून नवी मुंबईचा कारभार प्रशासकाच्या हाती

नवी मुंबई : महापालिकेवर लोकप्रतिनिधींनी स्थापन केलेल्या सत्तेची मुदत आज (ता.7) संपूष्टात आल्यामुळे आजपासून शहरात प्रशासक राजवट सुरू झाली आहे.सन 2015 साली एप्रिल-मे महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.

म्हणून नवी मुंबईचा कारभार प्रशासकाच्या हाती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेवर लोकप्रतिनिधींनी स्थापन केलेल्या सत्तेची मुदत आज (ता.7) संपूष्टात आल्यामुळे आजपासून शहरात प्रशासक राजवट सुरू झाली आहे. महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची राज्य सरकारने प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानुसार मिसाळ यांनी गुरूवारी संध्याकाळी प्रशासक पदाची सूत्रे स्विकारली. 

हे वाचा : मद्यपींना गुड न्यूज 

सन 2015 साली एप्रिल-मे महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. या निवडणूकीत सर्वाधिक जागा पटकावलेल्या आमदार गणेश नाईकांचा तेव्हाचा पक्ष राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सोबतीने पालिकेत सत्ता स्थापना केली. 7 मे रोजी सत्ताधाऱ्यांनी महापौर नियुक्त करून सत्ता चालवण्यास सुरूवात केली. पाच वर्षांचा कालावधी 7 मे 2020 ला संपणार असल्यामुळे 2020 च्या मार्च महिन्यातच राज्य निवडणूक आयोगाने निवडणूकांची घोषणा केली होती.

निवडणूकीपूर्वीची कामे सुरू असतानाच कोरोनाने भारतात प्रवेश केला. त्यामुळे निवडणूक आयोगाला नवी मुंबईत घोषीत केलेल्या निवडणूका पूढील आदेश येईपर्यंत मागे घ्यायला लागल्या. नवी मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता अखेर राज्य सरकारने महापालिकेची मुदत संपल्यानंतर 7 मे पासून आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानुसार गुरूवारी संध्याकाळ पासून लोकप्रतिनिधींची नगरसेवक पदे बरखास्त झाली. नगरसेवक पदांसोबत सर्व समित्याही बरखास्त झाल्या आहेत. 

हे वाचा : कोरोना संकटात "हे' आणखी एक संकट 

प्रशासकांच्या आदेशाने विकासकामे
 मिसाळ यांनी प्रशासक पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर शुक्रवारपासून प्रशासकाच्या कारभाराखाली महापालिकेच्या कामकाजाला सुरूवात होणार आहे. प्रशासकाच्या नियुक्तीमुळे आता 5 ते 25 लाख आणि त्यापेक्षा जास्त रक्कमेच्या कामांचे स्थायी समिती व सर्वसाधारण सभांचे अधिकार प्रशासक म्हणून मिसाळ यांना प्राप्त झाले आहेत. त्याप्रमाणे मिसाळ यांच्या आदेशानुसार महापालिकेतील सर्व कामे होणार आहेत.  

कोरोनामुळे राज्यावर आर्थिक संकटाचे सावट असताना महापालिकेचा कारभार चालवतानाही आवश्यक कामांना प्राधान्य दिले जाणार आहे. अनावश्यक कामांचा सद्या विचार केला जाणार नाही. विभाग प्रमुखांच्या बैठकीत गरजेनुसार प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजूरी दिली जाईल. 
अण्णासाहेब मिसाळ, प्रशासक, नवी मुंबई महापालिका.


 

loading image
go to top