अखेर एम.इंडिकेटर अँप मराठीत, मराठी भाषिकांच्या मागणीला यश

अखेर एम.इंडिकेटर अँप मराठीत, मराठी भाषिकांच्या मागणीला यश

मुंबई: मुंबई आणि पुणे उपनगरीय रेल्वे संदर्भातील माहिती देणारे एम. इंडिकेटर अँप मराठीत झाले आहे. अनेक कालावधीपासून अँप मराठीत करण्याची मागणी मराठी भाषिकांनी केली होती. या मागणीला अखेर यश मिळाले आहे. याबाबत  'सकाळ'ने वेळोवेळी बातमी प्रकाशित केली होती. तर, २० डिसेंबर रोजी 'नववर्षात एम. इंडिकेटर मराठी भाषेत' या आशयाची बातमी 'सकाळ'ने सर्वप्रथम प्रकाशित केली होती. 

एम. इंडिकेटर अँप हे नावाजलेले अँप आहे. या अँपमध्ये मिळणारी माहिती उत्तम असल्याने प्रत्येक रेल्वे प्रवाशांच्या मोबाईलमध्ये हे अँप असते. त्यामुळे अँपची लोकप्रियता अफाट झाली आहे. मात्र या अँपवर मराठी भाषा नसल्याने अनेकांना अँपमधील इतंभूत माहिती मिळत नव्हती. त्यामुळे या अँपमध्ये मराठी भाषा सुरु करण्याची मागणी केली जात होती. एम. इंडिकेटरच्या संस्थापकाकडून अँप मराठी भाषेत करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे आता हे अँप इंग्रजीसह मराठी भाषेत प्रवाशांसाठी उपलब्ध आहे.

एम. इंडिकेटर अँपवर लोकल, बेस्ट, एक्सप्रेस, एसटी, मोनो, मेट्रो, रिक्षा कॅब, फेरी, मुंबई स्थानक नकाशा यांची माहिती मिळते. आता प्ले स्टोरवरून हे अँप अपडेट करून इंग्रजीसह मराठीत माहिती मिळणे शक्य झाले आहे. स्थानकाचे नाव, मेगाब्लॉक माहिती, स्थानकाचा शोध घेताना मराठीतून माहिती मिळते. 

सर्व मराठी भाषिक प्रवाशांना रेल्वे आणि इतर पर्यायी वाहनांची माहिती मराठीतून मिळण्याची मागणी मराठीप्रेमी करत होते. एम. इंडिकेटर अँपच्या समाज माध्यमावर मराठीप्रेमी ही मागणी करत होते. यासह अनेकांनी मेलद्वारे एम. इंडिकेटरला संदेश पाठविले होते. तसेच अँपवर मराठी भाषा आणण्यासाठी एम. इंडिकेटरचे प्रयत्न सुरु होते. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

एम. इंडिकेटर अँपने मराठी भाषेचा पर्याय देऊन अँप सुरू केल्याबद्दल आभार व्यक्त करतो. सातत्याने पाठपुरावा करून मागणीला यश मिळाले, अशी भावना मराठी एकीकरण समितीचे सारंग जाधव यांनी व्यक्त केली.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Finally local train application m indicator marathi Language sachin teke

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com