अखेर मुंबई-मांडवा जलवाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

मांडवा-मुंबई जलवाहतूक साधारणपणे १ सप्टेंबरपासून सुरू होते. या वर्षी बदलत्या हवामानामुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला. सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांची संख्या कमी होती. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत पीएनपी, मालदार, अजंठा कंपनीच्या बोटी सुरू राहणार असल्याची माहिती मालदार कंपनीच्या सूत्राने दिली. 

अलिबाग ः तीन आठवड्यांच्या विलंबानंतर मुंबई-मांडवा (अलिबाग) जलवाहतूक सेवा सोमवारपासून (ता.२३) सुरू झाली. सकाळी ९ वाजता पीएनपी कंपनीची बोट प्रवाशांना मांडवा बंदरातून गेटवे बंदराकडे रवाना झाली. दुपारी ३ वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे.

मांडवा-मुंबई जलवाहतूक साधारणपणे १ सप्टेंबरपासून सुरू होते. या वर्षी बदलत्या हवामानामुळे ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला. सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांची संख्या कमी होती. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत पीएनपी, मालदार, अजंठा कंपनीच्या बोटी सुरू राहणार असल्याची माहिती मालदार कंपनीच्या सूत्राने दिली. 

शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यापूर्वी समुद्र पूर्णपणे शांत झालेला नव्हता, याचा फटका जलवाहतूक सुरू करण्यावर होत होता. लाटांमुळे मांडवा बंदरात तरंगती जेट्टी बसवण्यात अडथळे येत होते, असे म्हणणे बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांचे होते, अखेर शनिवारी ही जेटी बसविण्यात आली. 

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया यादरम्यान प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू झालेली आहे. समुद्र शांत होईपर्यंत सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोटी सुरू राहतील.  
- अनिल शिंदे, बंदर निरीक्षक, मांडवा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally, the Mumbai-Mandawa launch is underway