esakal | आम्हाला भाडं देणं शक्य नाही...मुंबईत व्यावसायिकाची पत्नीसह शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

आम्हाला भाडं देणं शक्य नाही...मुंबईत व्यावसायिकाची पत्नीसह शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या

एका व्यावसायिकानं आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याचं समजत आहे. राहत्या घरीच त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. जिग्नेश जितेंद्र दोशी (४५), कश्मिरा दोशी (४३) असे या दाम्पत्याचे नाव आहे. घरात एक सुसाईट नोट देखील सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आम्हाला भाडं देणं शक्य नाही...मुंबईत व्यावसायिकाची पत्नीसह शॉवरला गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मुंबईतल्या कांदिवली भागात आत्महत्येचा धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका व्यावसायिकानं आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याचं समजत आहे. राहत्या घरीच त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. जिग्नेश जितेंद्र दोशी (४५), कश्मिरा दोशी (४३) असे या दाम्पत्याचे नाव आहे. घरात एक सुसाईट नोट देखील सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या दाम्पत्याला एक १७ वर्षीय मुलगा देखील आहे. डहाणूकरवाडी येथील सुनिता अपार्टमेंट इमारतीत जिग्नेश हे पत्नी आणि मुलगा पार्थ यांच्यासह राहायला होते.  गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं. त्यातच दोशी यांना ही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. याच आर्थिक संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून घर भाडं देऊ शकले नसल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या आत्महत्येच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.  आम्ही दोघे आत्महत्या करत असून इतर कोणालाही जबाबदार धरू नये असे चिठ्ठीत नमुद केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचाः  मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला, केवळ 'इतके' टक्केच जलसाठा कमी
 

नेमकं काय घडलं

रात्री ११ च्या सुमारास मुलगा घरी गेला. त्यावेळी त्याला त्याची आई मृत अवस्थेत बेडवर दिसली. आईला मृतअवस्थे पाहिल्यानंतर तो ओरडतच वडिलांना आवाज देऊ लागला. दुसऱ्या खोलीत वडिलांना शोधायला गेला तर त्याचे वडील कुठेच दिसले नाहीत. त्याचवेळी मुलाच्या लक्षात आलं की, बाथरुमचा दरवाजा आतल्या बाजूनं बंद आहे. म्हणून त्यानं वेळ न काढता बाथरुमचा दरवाजा तोडला. बाथरुममधलं दृश्य बघून त्याला धक्काच बसला. 

अधिक वाचाः  'त्या' युरोप ट्रिपनंतर कसं बदललं सुशांतचं आयुष्य, रियानं केला खुलासा

जिग्नेश यांनी बाथरुममधील शॉवरला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. मुलानं लगेचच झालेल्या प्रकाराची माहिती शेजारच्यांना दिली आणि त्यानंतर पोलिसांनी कळवण्यात आलं. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत जिग्नेश आणि काश्मीराचा मृतदेह ताब्यात घेतला.  याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तर दोशी दाम्पत्याचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही मृतदेहाची कोविड चाचणी केली असल्याचं समजतंय. जिग्नेश हे शेअर ट्रेडर असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. या लॉकडाऊनच्या काळात त्यांना बराच आर्थिक फटका बसला आणि म्हणूनच त्यांनी अशी टोकाची भूमिका घेतली.

Financial issues share trader end life with wife kandivali crime news

loading image
go to top