मुंबईकरांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला, केवळ 'इतके' टक्केच जलसाठा कमी

पूजा विचारे
Thursday, 27 August 2020

२४ ऑगस्टला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात   ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, तलाव क्षेत्रात आतापर्यंत  ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता तलाव क्षेत्रात फक्त ५ टक्के जलसाठा कमी आहे.

मुंबईः ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत.  सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे. २४ ऑगस्टला मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात   ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला होता. दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, तलाव क्षेत्रात आतापर्यंत  ९४.९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. आता तलाव क्षेत्रात फक्त ५ टक्के जलसाठा कमी आहे.

मुंबईला ७ तलावांतून पाणीपुरवठा केला जात असून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. गेल्या अनेक दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळं तुळशी, विहार, मोडकसागर, तानसा हे तलाव भरून वाहू लागलेत.

यंदा पावसानं जून आणि जुलै महिन्यात पुरेशी हजेरी न लावल्यानं मुंबईकरांवर पाणी संकट आलं. मात्र ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली.  त्यानंतर तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं गेल्या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये तलाव भरलेत.

अधिक वाचाः 'त्या' युरोप ट्रिपनंतर कसं बदललं सुशांतचं आयुष्य, रियानं केला खुलासा

वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात १ ऑक्टोबरला १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणं अपेक्षित आहे. सध्या १३ लाख ७३ हजार जलसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात तलावांमध्ये ९६ टक्के जलसाठा होता.

हेही वाचाः  नॉन कोविड रूग्णांची मोठ्या रूग्णालयांकडे पाठ, जाणून घ्या त्या मागचं नेमकं कारण

अनेक दिवसांपासून पावसाची संततधारा सुरू असून, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रातही चांगला पाऊस पडला आहे.  यामुळेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. जून,जुलै महिन्यात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे मुंबईत ५ ऑगस्ट पासून २० टक्के पाणी कपात करण्यात आली होती.ऑगस्ट मध्ये झालेल्या दमदार पावसामुळे २१ ऑगस्ट पासून ही पाणी कपात १० टक्‍क्‍यांवर आणण्यात आली.  ही उर्वरित १० टक्के पाणीकपातही रद्द होणार शक्यता आहे.

Mumbai Water storage 7 lakes need five percent water


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Water storage 7 lakes need five percent water