मृत नौदल अधिकाऱ्याच्या खात्यावर डल्ला

dead_body
dead_body

मुंबई : मृत नौदल अधिकाऱ्याच्या बॅंक खात्यातून एटीएमद्वारे साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याची तक्रार दाखल झाल्यामुळे पोलिसही अचंबित झाले होते. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून 39 वर्षांच्या आरोपीला अटक केली आहे. 

नौदलातील निवृत्त कॅप्टन रॉल्स कुटिनो यांचे 4 जूनला गोवंडीतील गंगा सोसायटीतील घरात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून साडेदहा लाख रुपये काढण्यात आल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी बॅंकेत चौकशी केली असता, एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याचे समजले. कुटिनो यांच्या भावाने तत्काळ गोवंडी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तोतयेगिरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला. 
पोलिसांनी संबंधित एटीएम सेंटरमधील सीसी टीव्ही चित्रणाची तपासणी केली असता एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याचे आढळले. त्यावरून पोलिसांनी गोवंडी परिसरात राहत असलेल्या रेहान मेमन (39) याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्हा मान्य केला. दोन साथीदारांच्या मदतीने कुटिनो यांच्या खात्यातील साडेदहा लाख रुपये लंपास केल्याचे त्याने कबूल केले. 

या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे, असे गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले. 

एटीएम कार्ड चोरले 
कॅ. राफल्स कुटिनो घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची माहिती एक-दोन दिवसांनी कुटुंबीयांना मिळाली होती. त्यांचा मृतदेह घरातून बाहेर काढण्यासाठी रेहान मेमन तेथे आला होता. त्या वेळी तेथे पडलेले एटीएम कार्ड त्याने चोरले आणि नंतर एटीएममधून रक्कम काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com