संरक्षण दलाच्या औषध गैरव्यवहाराचा मार्ग औषध विक्रेत्याच्या संघटनेच्या घरात

संरक्षण दलाच्या औषध गैरव्यवहाराचा मार्ग औषध विक्रेत्याच्या संघटनेच्या घरात

मुंबई : संरक्षण विभागाच्या औषधांच्या काळाबाजारप्रकरणी मुंबईच्या औषध घाऊक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचे पुत्र ध्रुव मेहता यांच्याविरोधात एफडीएने गुन्हा नोंदवला आहे. या गैरव्यवहारात औषध संघटनेतील कुटुंबीयांचा थेट समावेश असल्याने हा राष्ट्रीय पातळीवरचा गैरव्यवहार असल्याचा दावा औषध व्यवहारक्षेत्रातून व्यक्त केला जात आहे. 

मुलुंडच्या सेफलाईफ एंटरप्रायजेसचे संचालक दीपेश ताराचंद गाला, ध्रृव दिलीप मेहता यांच्यासह भायखळ्यातील निवान फार्माक्‍युटिकल्सचे मालक विनीताल निक्षित लुनीया, निक्षित लुनीया यांच्यासह मेडलाईफ या ऑनलाईन औषधविक्रेत्या संस्थेचे संचालक प्रशांत सिंग, तुषार कुमार, सौरभ अग्रवाल सह अन्य काही जणांवर एफडीएने गुन्हे दाखल केले आहेत. एफडीएच्या अंदाजानुसार, या औषधांचा पुरवठा दिल्ली व मध्यप्रदेशातील पुरवठ्यांवरुन झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

सूत्रांच्या दाव्यानुसार, पश्चिम बंगालमधूनही हा पुरवठा झाला आहे. याबाबतची बातमीही 'सकाळ'ने 7 फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधील औषधेही मुंबईतील बाजारात या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. या प्रकरणी मुंबईचे औषध घाऊक विक्रेता संघटनेचे दिलीप मेहता यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या संपूर्ण धाडीत 30 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. अजून धाडी सुरु असून, अन्य आरोपींवरही लवकरच गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती एफडीएच्या आयुक्त डॉ पल्लवी दराडे यांनी दिली. 

अन्य औषधेही मिळाली 

विण्टाग्लीप्टीन गोळ्या, सीटाग्लिप्टीन गोळ्या यांसह, अर्सोलीअन टॅब्लेट्‌स आणि लाण्टस सोलो स्टार इंजेक्‍शन हा संरक्षण विभागाचा साठाही एफडीएने धडक सत्रात जप्त केला आहे. 

औषध संघटनेचा दावा 

या प्रकरणातील दोषी ध्रुव दिलीप मेहता याला यापूर्वीच आम्ही संघटनेच्या सदस्यातून काढले आहे. औषधांची ऑनलाईन विक्रीत ध्रुव सहभागी असल्याचे समजल्यानंतर आम्ही ही कारवाई केली. संरक्षण विभागाच्या औषध गैरव्यवहार प्रकरणात दिलीप मेहता दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. 

- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना आणि महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com