Mohit Kamboj Bhartiya | पत्रकार परिषदेआधीच भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल, घडामोडींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MOHIT KAMBOJ

पत्रकार परिषदेआधीच भाजपच्या नेत्यावर गुन्हा दाखल, घडामोडींना वेग

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांना अखेर अटक झाली. न्यायालयाने या प्रकरणात मलिकांना ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मंत्रीमहोदयांना अटक झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांन जल्लोष केला. (Nawab Malik Arrested in Money Laundering Probe)

मलिक यांनी आर्यन खान प्रकरणात आरोप केलेला भाजप नेता मोहित कंबोज यानेही भाजप कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला. मलिकांना झालेली अटक योग्य असल्याचं त्यानं म्हटलं. यानंतर तलवारही उपसली. या नाट्यमय घडामोडींनंतर आता भाजप मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. (FIR filed against Mohit Kamboj)

हेही वाचा: 'सुबह 5 बजे उठा के ले जाते हैं', मलिकांवरील कारवाईनंतर भाजप नेत्याचं ट्वीट

आज दिवसभर भाजप रस्त्यावर उतरून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे. मात्र त्या आधीच घडामोडींना वेग आला असून मोहित कंबोजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोविड नियमांचे उल्लंघन करण्यासह शस्त्रास्त्र कायद्यांच उल्लघंन केल्याप्रकरणी ही कारवाई होणार आहे. यावर मोहित कंबोज यानेही प्रतिक्रिया दिलीय. सरकारच्या सांगण्यावरून पोलिसांनी जबरदस्ती गुन्हा दाखल केल्याचं त्यानं म्हटलंय.

हेही वाचा: नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंभोज यांनी नाचवली तलवार!

काय म्हणाले कंबोज?

कुंभोज म्हणाले, मी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मी यावर सविस्तर बोलू शकेन. रिमांड कॉपी हाती आल्यानंतर त्यांनी गेल्या वीस वर्षात जे जे गुन्हे केले आहेत ते समोर आणेल. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिकांचे जे संबंध होते, आहेत तसेच ज्या प्रकारे त्यांच्याकडून जे आर्थिक व्यवहार झाले आहेत. यावर पुढे जशी चौकशी जाईल त्यातून भ्रष्टाचारी मलिकांचे कपडे उतरतील.

Web Title: Fir Filed Against Mohit Kamboj Bhartiya Over Nawab Malik Arrest Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nawab malik
go to top