नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंभोज यांनी नाचवली तलवार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Kambhoj
नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंभोज यांनी नाचवली तलवार!

नवाब मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंभोज यांनी नाचवली तलवार!

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप कार्यकर्ता मोहित कंभोज (Mohit Kambhoj) यांच्या कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. तसेच स्वतः कंभोज यांनी तलवार नाचवली. (BJP Mohit Kambhoja danced the sword after Malik arrested by ED)

हेही वाचा: 'वरण भात लोन्चा' भोवला, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल

कुंभोज म्हणाले, मी उद्या सकाळी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे. कोर्टातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मी यावर सविस्तर बोलू शकेन. रिमांड कॉपी हाती आल्यानंतर त्यांनी गेल्या वीस वर्षात जे जे गुन्हे केले आहेत ते समोर आणेल. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत नवाब मलिकांचे जे संबंध होते, आहेत तसेच ज्या प्रकारे त्यांच्याकडून जे आर्थिक व्यवहार झाले आहेत. यावर पुढे जशी चौकशी जाईल त्यातून भ्रष्टाचारी मलिकांचे कपडे उतरतील.

हेही वाचा: नवाब मलिकांच्या राजीनाम्याची गरज नाही - राष्ट्रवादी काँग्रेस

१९९३ च्या बॉम्बस्फोटात ज्याचा हात आहे असा माणूस उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री राहिला हा महाराष्ट्र आणि देशासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. यामुळं मलिकांना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा. तातडीनं त्यांना पदापासून दूर करावं. बॉम्बस्फोटातील पीडितांना आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं मला वाटतं. सत्तेतील खुर्चीत बसलेल्या मंत्र्याचे दाऊद, हसिना पारकर, छोटा शकील सोबत काय संबंध होते याचं उत्तर महाविकास आघाडी सरकारला येत्या काळात द्यावं लागेल.

Web Title: Bjp Mohit Kambhoja Danced The Sword After Malik Arrested By Ed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpMumbai Newsnawab malik