FIR on Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल! नेमकं काय घडलंय? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jitendra awhad

Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल! नेमकं काय घडलंय? वाचा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाविरोधात वक्तव्य करणं त्यांना भोवलं आहे. आव्हाडांवरील एफआयआरमध्ये चार वेगवेगळ्या कलमांचा समावेश आहे. (FIR registered against NCP leader Jitendra Awhad for his remarks against Sindhi community)

सिंधी समाजाच्या भावना दुखावणारं विधान केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये त्यांच्यावर भादंवि कलम १५३ अ, १५३ ब, २९५ अ आणि २९८ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलंय?

उल्हासनगर इथं कार्यकर्त्यांना संबोधित करताना जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला उद्देशून एक विधान केलं होतं. हे विधान सिंधी समाजाचा अपमान करणारं असल्याचं सांगत यावर सिंधी समाजानं आक्षेप घेतला. तसेच याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजानं कोपरी इथं एकत्र येत आव्हाडांचा निषेध नोंदवला. तसेच जोपर्यंत तो समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत विविध संविधानिक मार्गानं त्यांचा निषेध नोंदवला जाईल, अशी भूमिका घेतली.