बेकायदा फटाकेविक्रेत्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा

File Photo
File Photo

नवी मुंबई : सार्वजनिक ठिकाणी बेकायदा फटाकेविक्रीचा स्टॉल लावून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या फटाकेविक्रेत्यांवर एपीएमसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्याजवळील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे फटाकेही जप्त केले आहेत.

फटाकेविक्रीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांसह, अग्निशमन दल, तसेच महापालिकेकडून परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र एपीएमसीतील व्यापारी पारस प्रजापती राजपूत या दुकानदाराने कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता, एपीएमसी, सेक्‍टर- १९ मधील मर्चंट शॉपिंग सेंटरमध्ये शॉप क्रमांक ३ व ४ मध्ये विनापरवाना फटाकेविक्रीचा स्टॉल सुरू केला होता.

याबाबतची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी (ता.२५) दुपारी पारस राजपूत यांच्या फटाक्‍याच्या स्टॉलवर कारवाई करून त्यांच्या स्टॉलमध्ये असलेले सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे फटाके जप्त केले. पारस राजपूत याने सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही खबरदारी न घेता, विनापरवानगी फटाक्‍यांचा स्टॉल लावल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com