Mumbai : पेट्रोलपंपाजवळील MNGL च्या पाईपलाईनला आग; आग नियंत्रणात

Mumbai : पेट्रोलपंपाजवळील MNGL च्या पाईपलाईनला आग; आग नियंत्रणात

Fire Accident In Mumbai Paral Area : मुंबईतील परळमध्ये पेट्रोलपंपाच्या बाजूला आग लागली होती. ही आग महानगर गॅसच्या पाईपलाईनमधील गॅस गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग पेट्रोलपंपाच्या बाजूला लागल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनेचं गांभीर्य लक्षात गेत आगीवर नियंत्रत मिळवण्यात यश मिळवले आहे. लागलेली ही आग अगदी पेट्रोलपंपाजवळ लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. त्यासाठी या ठिकाणची दुकानं आणि वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

महानगर पाईपलाईमधून गॅस लीक होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सुरक्षेसाठी धावपळ केली नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जर या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले गेले नसते तर, मोठा अनर्थ झाला असता अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून, पेट्रोलपंपा जवळून अशा प्रकारे गॅस पाईपलाईन जाऊ शकते का? आणि गेल्यास अशा प्रकारचा घटना घडल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाय योजना असा प्रश्न यामुळे नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com