Bandra Kurla Complex Metro Station FireESakal
मुंबई
BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी
Fire Breaks out at BKC metro station: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनवर आगीची घटना घडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
मुंबई: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा एंट्री/एक्झिट A4 जवळ आगीच्या घटना घडली आहे. यामुळे घबराट पसरली आहे. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. स्टेशन परिसराबाहेर लागलेल्या या आगीमुळे स्थानकात धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात आली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या.

