पवईत ह्युंडाई सर्विस सेंटरला भीषण आग, आत कर्मचारी अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवईत ह्युंडाई सर्विस सेंटरला भीषण आग, आत कर्मचारी अडकले

पवईत ह्युंडाई सर्विस सेंटरला भीषण आग, आत कर्मचारी अडकले

मुंबई: पवई येथील साकी विहार रोडवरील एल ॲण्ड टी गेट नंबर ६ समोरील साई ऑटो ह्युंडाई सर्विस सेंटर शोरुमला भीषण आग (Powai hyundai service center fire) लागली आहे. या भीषण आगीत कर्मचारी आत अडकल्याची माहीती मिळत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire brigade) चार गाडया घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

शो रुममध्ये सकाळी ११ च्या सुमारास ही आग भडकली. लेव्हल एकची ही आग आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कोणीही जखमी झालेले नाही. शो रुमच्या आसपास रहिवाशी इमारती आहेत. त्यामुळे थोडी चिंता आहे. काळ्या धुराचे लोट आकाशात जाताना दिसत आहेत.

loading image
go to top