भिवंडीत आगीत चौघांचा होरपळून मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

हरिहर कंपाऊंडमधील प्लॅस्टिकच्या गोदामाला आज (रविवार) दुपारी अचानक आग लागली. आग भडकल्याने चार कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

भिवंडी - शहरातील दापोडा भागातील हरिहर कंपाऊंडमधील प्लॅस्टिकच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिहर कंपाऊंडमधील प्लॅस्टिकच्या गोदामाला आज (रविवार) दुपारी अचानक आग लागली. आग भडकल्याने चार कामगारांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर, दोघे जण जखमी आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कामगारांचे मृतदेह बाहेर काढले असून, शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलिस अधिक तपास करत आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Web Title: fire in bhiwandi, 4 dead