कर्जत : कर्जत शहरातील महावीर पेठ येथील बँक ऑफ इंडिया शाखेला रविवारी (ता. ७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन कॉम्प्युटर, एक प्रिंटर, सर्व्हरचे साहित्य तसेच काही टेबल जळून खाक झाले आहेत. लॉकर रूममधील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहिली असली तरी काही कागदपत्रांची यादी जळाल्याचे सांगण्यात आले.