Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

Kandivali Commercial Building Fire: कांदिवलीत आगीची घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेतून ११ जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे.
Kandivali Fire

Kandivali Fire

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत पहाटेच्या सुमारास कांदिवली येथे आगीची घटना घडली आहे. कांदिवली स्टेशन परिसरात अभिराई हॉटेलजवळ एका व्यावसायिक इमारतीत आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम सुरु करण्यात आले. या आगीत अडकलेल्या ११ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढून दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com