

Fire breaks out at historic Byculla Police Station first floor administrative office short circuit suspected Mumbai
Sakal
भायखळा : भायखळा पूर्व येथील हंसराज मार्ग स्थित ब्रिटिशकालीन भायखळा पोलिस ठाण्याच्या इमारतीला रविवारी (ता. २६) रात्री ८.३०च्या सुमारास अचानक आग लागली. पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील प्रशासकीय आणि जनसंपर्क कार्यालयाला ही आग लागली. पोलिस ठाण्याचे स्लॅब, जिने आदी बहुतांश बांधकाम लाकडी असल्याने आग पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.