

Mumbai Fire Bridge Special Fire Safety Campaign
ESakal
मुंबई : गोव्यात नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने थर्टी-फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ हाती घेतली आहे. या अंतर्गत अग्निशमन दलाने ९०७ हॉटेल, रेस्टॉरंट, पब, बार, जिमखाने इत्यादींची झाडाझडती घेतली. यामध्ये १६ आस्थापनांना नोटीस बजावण्यात आल्या, तर ४१ आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली.