मालवणीत गोदामाला आग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

मालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी होत्या. मार्गातील अडथळ्यांमुळे सुरुवातीला १५ ते २० मिनिटे आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून उशीर झाला.

अरुंद व खड्डेमय रस्ता आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या, तसेच रस्त्याच्या काठावर उभे असलेले पालिकेचे फिरते शौचालय, वाटेतील खुले गटार यामुळे अग्निशमनच्या गाड्यांना उशीर झाला. आग एवढी भीषण होती की, मोठ्या ज्वाळा उठत होत्या. जवळच्या आसन आवरणांच्या कारखान्यापर्यंत आग पोहचली होती. तेथील थोड्याफार सामानालाही आग लागली होती; मात्र ते सामान वेळीच हलवण्यात आल्याने अनर्थ टळला.

स्थानिकांची मोलाची मदत
घटनास्थळाशेजारच्या आसनांवरील आवरणाच्या कारखान्याच्या छतावरून अग्निशमन दलाच्या दोन जवानांसोबत स्थानिक तरुणही मदतीला होते. आवरणाच्या कारखान्यातील कामगारांकडूनही अग्निशमनचा उपयोग करण्यात आला. एकंदरीत ही आग आटोक्‍यात आणण्यासाठी स्थानिकांकडून अग्निशमन दलाची मोठी मदत झाली.

Web Title: Fire godown in Malvani

टॅग्स