मालवणीतील गोडाऊनला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

मालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. 

मालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. 

या लागलेल्या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुरवातीला 15 ते 20 मिनिटं आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून उशीर झाला. तसेच रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता.  तसेच रस्त्याच्या काठेवर उभं असलेलं पालिकेच फिरत शौचालय आणि खुल गटारामुळेही अडचण निर्माण होत होती. ही आग इतकी भीषण होती, की काही क्षणांत मोठं-मोठे आगीचे लोळ उसळत होते. मात्र, सुदैवाने शेजारी असलेल्या सिट कव्हरच्या कारखान्याच्या छतावरून अग्निशमन दलाच्या दोन जवानांसोबत स्थानिक तरुणही मदतीला उभे राहिल्याने त्यांना आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत झाली.

दरम्यान, सीट कव्हरच्या कारखान्यात असलेल्या सिलिंडरचा आग आटोक्यात आणण्यासाठी उपयोग करण्यात आला. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीने ही आग अखेर आटोक्यात आणण्यात आली. 

Web Title: Fire at Godown in Malvani Kharodi