दिवा कचराभूमीला आग; धुराच्या लोंढ्यामुळे नागरीक हैराण

राहूल क्षीरसागर
Sunday, 29 November 2020

दिवा येथील कचराभूमीला शनिवारी (ता.29) सकाळी पुन्हा भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यात वारंवार कचराभूमीला लागत असलेल्या आगीमुळे येथील आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळच्या वेळी घराच्या खिडक्या बंद करून बसावे लागत आहे.

ठाणे : दिवा येथील कचराभूमीला शनिवारी (ता.29) सकाळी पुन्हा भीषण आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले आहे. त्यात वारंवार कचराभूमीला लागत असलेल्या आगीमुळे येथील आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना संध्याकाळच्या वेळी घराच्या खिडक्या बंद करून बसावे लागत आहे. त्यात वारंवार आग लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

उल्हासनगरातील प्रांताधिकाऱ्यांना गाडीसह जाळून टाकण्याची धमकी; मनसे पदाधिकाऱ्याच्या भाच्याला अटक 

दिवा शहराला लागून असलेल्या कचराभूमीला वारंवर आग लागण्याच्या घटना घडत आहे. ही आग विझवल्यानंतर हवेत उडणारे धुराचे लोंढे यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत विविध पक्षातील लोकप्रतिनिधी व स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून वारंवार आंदोलने करण्यात आली. ठाणे महापालिकेवर मोर्चा देखील काढण्यात आला. मात्र अद्यापही या कचराभूमीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश आले नाही. त्यात मागील सहा ते सात महिन्यांपासून कोरोना सारख्या महामारीने नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यातच आता शनिवारी सकाळी य़ेथील कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे उठणारे धुरांच्या परिसरात सर्वत्र धुराचे व दुर्गंधी पसरली आहे. यामुळे येथील नागरिकांना श्वसनाचे त्रास होवू लागले आहे. तसेच परिसरातील अनेक नागरिक तर, संध्याकाळच्यावेळी घरांच्या खिडक्या उघडणे देखील कठीण झाले आहे. 

डीजी ठाणे बेस्ट डिजिटल इनिशिएटिव्ह अवॉर्डचे मानकरी; ई-समिट गव्हर्नमेंट ग्लोबल स्मार्ट सिटीज फोरमच्या वतीने गौरव

दिवा येथील कचराभूमीला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे पसरणाऱ्या धुराच्या साम्राज्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासनाकडून तक्रार करून कोणतीही कारवाई करण्यात येत नसून, याबाबत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.
- निलेश पाटील,  उपाध्यक्ष, भाजप, ठाणे शहर.

---------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at the landfill at Diva; Citizens harassed by smoke