मुंबईतल्या पवई भागात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

3 हजार चौरस फूट असलेल्या या मजल्यावर वायरिंग, इंस्टॉलेशन आणि केबल्स, स्पिल्ट एसी आहेत. यामुळे मजल्यावर आग पसरल्याचं समजतंय. 

मुंबई : पवईमध्ये एका व्यावसायिक इमारतीला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी ही आग लागलीय. पवई परिसरातील हिरानंदानी गार्डन येथे सात मजली व्यावसायिक इमारत आहे. याच इमारतीला आग लागली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे. या आगीत जीवितहानी झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पहाटे 6.15 च्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली. 3 हजार चौरस फूट असलेल्या या मजल्यावर वायरिंग, इंस्टॉलेशन आणि केबल्स, स्पिल्ट एसी आहेत. यामुळे मजल्यावर आग पसरल्याचं समजतंय. 

महत्वाची बातमी ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

या आगीमुळे इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यांवर धूर पसरला, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली. सकाळी सातच्या सुमारास ही पातळी-2 ची आग असल्याचं जाहीर करण्यात आलं.पाच फायर इंजिन, एक फोम टेंडर आणि चार जंबो टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

मानखुर्दच्या झोपडपट्टीत अग्नितांडव

गेल्या आठवड्यात मानखुर्दच्या मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग लागली होती. लेव्हल 3 ची ही भीषण आग होती. आगीत या भागातील अनेक गोदामे खाक झाली होती. झोपडपट्टीतील प्लॅस्टिक भंगार गोडाऊनला ही आग लागली होती.

fire in Powai area of ​​Mumbai, fire brigade rushed to the spot


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire in Powai area of ​​Mumbai fire brigade rushed to the spot