शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कामाठीपुरा कोरोनामूक करणारे पालिकेच्या ई वॉर्ड चे साहाय्यक आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

मुंबई : कामाठीपुरा कोरोनामूक करणारे पालिकेच्या ई वॉर्ड चे साहाय्यक आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. मकरंद दगडखैरे असं त्यांचे नाव असून उपचारासाठी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापालिका 'ई' विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून नव्याने दाखल झाल्यानंतर लॉकडाऊन आणि कोरोना काळात हॉटस्पॉट्स असलेल्या भायखळा विभागात ग्राऊंडवर उतरुन काम करत असल्याने कोरोना संसर्ग व्यक्तींच्या न कळत संपर्कात आलेल्या ई वॉर्ड सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांना कोरोनाची बाधा झाली.

मोठी बातमी - मुंबईच्या ताज हॉटेलला दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा फोन... यंत्रणा अलर्ट 

सोमवारी रात्री त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सहाय्यक आयुक्त म्हणून एप्रिल महिन्यात नियुक्ती झाल्यानंतर दगडखैर यांनी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या भायखळ्यात योग्य कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळविले. त्यानंतर भायखळा पूर्वेकडील केंद्रशासनाच्या अखत्यारीत रिचर्डसन अँड क्रूडास कंपनी परिसरात तात्पुरत्या स्वरूपात कोविड उपचार केंद्र उभारण्यात येत असून, हे केंद्र 300 ऑक्सिजन बेड सहित 1000 खाटांची क्षमतेने उभारण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न केले. त्यातूनच या केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

मोठी बातमी - वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक...

मुंबई सेंट्रल जवळील कामाठीपुरा हा परिसर 'रेड लाईट' परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात सुरुवातीला इथे ही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला. 75 देहविक्री करणाऱ्या महिला कोरोना बाधित झाल्या होत्या. त्यामुळे हा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका होता. पालिकेचे साहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी हा परिसर 'कंटेन्मेंट झोन', 'रेड झोन'  म्हणून घोषित करत यंत्रणा कामाला लावली. परिसर सील करून लोकांची ये-जा थांबवली. 'फिवर क्लिनिक'च्या माध्यमातून लोकांची तपासणी सुरू केली. अनेक सामाजिक संघटनांना हाताशी धरून ही स्वतःला झोकून दिले.

मोठी बातमी -  आता 'या' कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा; ओळखपत्र सक्तीचे...

ग्राउंड लेव्हलवर काम करताना नागरिकांशी सतत संपर्क होता. त्यातच त्यांना ताप जाणवू लागला. आणि त्यांनी कोविड चाचणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना सोमवारी रात्री सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्याकडून मिळाली.

assistant commissioner makarand dagadkhaire detected covid19 positive


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assistant commissioner makarand dagadkhaire detected covid19 positive