ठाणेकरांनो! उद्यापासून असा असेल 'लॉकडाऊन', प्रशासनाकडून 'नियमावली' जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

ठाणे महानगरपालिकेनं कडक पावलं उचलतं पुन्हा एकदा  लॉकडाऊन लागू केला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यातच आता मुंबईनंतर ठाणे, कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिवसेंदिवस या भागातल्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा नियंत्रणात आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं कडक पावलं उचलतं पुन्हा एकदा  लॉकडाऊन लागू केला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्याची घोषणा प्रशासनानं केली आहे.

Big Breaking : 'लालबागचा राजा' यंदा विराजमान होणार नाही, मंडळाने घेतला ऐतिहासिक निर्णय

उद्यापासून ठाण्यात सगळे नियम आणि निर्बंध पुन्हा लागू करण्यात येतील. 2 जुलैला सकाळी 7 वाजल्यापासून ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कंटेन्मेंट झोनमध्ये अधिक प्रभावीपणे लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात येणारेत. ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनाबाबत पालिका प्रशासनाकडून नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. 

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या अधिक 

ठाण्यामध्ये २९ जून २०२० रोजीच्या आकडेवारीनुसार 36,002 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,656 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 20,474 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिवाय 871 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. शहरातील वाढता प्रादुर्भाव पाहता ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्तांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर 2 जुलैपासून महापालिका क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी ठाण्यातील बाजार परिसरात आज सकाळपासून नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. लोक जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरत असल्याचे आज दिसून आले.

हे ही वाचा खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

कसा असेल ठाण्यातील लॉकडाऊन 

  • जीवनावश्यक आणि नाशवंत वस्तूच्या ने-आण कारणाशिवाय इतर सर्व कारणांसाठी मनाई असेल. 
  • आपत्कालीन वैद्यकीय सेवेअंतर्गत प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी. इंटरसिटी एमएसआरटीसी बसेस आणि मेट्रो सह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी नाही.
  • सर्व आंतरराज्यीय बस, प्रवासी वाहतूक, खासगी वाहने, खासगी ऑपरेटर्सचं कामकाज बंद असेल, बाहेर जाणाऱ्या टुरिस्ट वाहनांना परवानगी असेल. बाहेरून येऊन बाहेर जाणाऱ्या वाहनांना परवानगी असेल.
  • टॅक्सी, ऑटो रिक्षा यांना परवानगी नाही. मात्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा घेण्यासाठी देण्यासाठी प्रवाशांच्या वाहतुकीस परवानगी असेल. या ऑर्डर अंतर्गत ड्रायव्हरशिवाय केवळ एका प्रवाशाचा खाजगी वाहनांना परवानगी असलेल्या जीवनाश्यक वस्तू आरोग्य सेवा आणि या अंतर्गत मान्य कृतीकरिता परवानगी असेल.
  • व्यावसायिक अस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा गोदाम इत्यादींसह सर्व दुकाने त्यांचं कामकाज बंद ठेवतील. वैद्यकीय उत्पादने, डाळ, तांदूळ, गिरणी, खाद्य आणि संबंधित उद्योग, दुग्धशाळा, खाद्य आणि चारा इत्यादींच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनांच्या युनिट्सना संमती असणार आहे. 
  • ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणे आवश्यक आहे, त्यांनी त्यांचे सक्त पालन केले पाहिजे. नाहीतर तो/ ती कठोर दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. त्या व्यक्तीला महापालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये स्थलांतरित केले जाईल.
  • सर्व रहिवासी घरीच राहतील. सामाजिक परवानगीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. केवळ परवानगी असलेल्या कामासाठी बाहेर येतील. सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास परवानगी नाही.
  • सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचाऱ्यांचा ऑपरेट करण्याची परवानगी असेल. चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून तीन फूट अंतर ठेवणे बंधनकारक, आवारात योग्य स्वच्छता आणि सॅनिटायझर हात धुण्याच्या सुविधांची उपलब्धता गरजेची आहे.

in thane Lockdown start from tomorrow, Rules announced by the administration


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in thane Lockdown start from tomorrow, Rules announced by the administration