Mumbai News : मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस गाडीच्या डब्याखाली लागली आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai News : मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस गाडीच्या डब्याखाली लागली आग

डोंबिवली - मुंबई हैद्राबाद एक्सप्रेस गाडी ठाकुर्ली ते कल्याण स्थानका दरम्यान प्रवास करत असताना गाडीच्या एसी डब्याखाली आग लागून धूर येऊ लागला. धूर जास्त येऊ लागल्याने प्रवाशांनी चेन खेचत गाडी थांबवली.

काही प्रवाशांनी घाबरून डब्यातून खाली पटरीवर उड्या मारल्या. रेल्वे कर्मचारी व आपत्कालीन पथकाने समय सुचकता दाखवीत त्वरित या आगीवर नियंत्रण मिळविले. आग विझवल्या नंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.

मुंबई हैद्राबाद एक्सप्रेसच्या डी 1 एसी डब्याखाली दुपारी 3 च्या सुमारास आग लागली. आगीमुळे एसीच्या डब्याखालून धूर निघत होता. ही माहिती तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांनी दिली. ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.

बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ प्रयत्न करत आग विझवली. त्यामुळे वेळीच मोठं संकट टळलं. आग विझवेपर्यंत रेल्वेत बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उतरणं पसंत केलं.

बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या फवाऱ्यांनी आग पूर्णपणे विझवली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आग विझवल्या नंतर कल्याण स्टेशन वर गाडीची पुन्हा तपासणी करून गाडी पुढच्या प्रवासा साठी रवाना करण्यात आल्याची माहिती स्टेशन मास्टर यांनी दिली.