मुंबईत फटाकेबंदीमुळे आगीच्या घटनांमध्ये घट! आग लागण्याचे दोन दिवसांत फक्त 15 दूरध्वनी

मुंबईत फटाकेबंदीमुळे आगीच्या घटनांमध्ये घट! आग लागण्याचे दोन दिवसांत फक्त 15 दूरध्वनी

 मुंबई - यंदा कोरोनामुळे दिवाळी फटाकेमुक्त साजरी करा, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेने केले होते. आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी आवाजी फटाक्यांऐवजी विना आवाजी फटाक्या फोडल्या. यामुळे प्रदूषणही नियंत्रणात कमी झाले असून फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या संख्येत घट झाली आहे. दरवर्षी दिवाळीत 150 ते 200 आगीचे दूरध्वनी येतात. परंतु यावर्षी आगीच्या घटनांमध्ये घट झाली असून फक्त 15 दूरध्वनी आल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी सांगितले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव आगीवर नियंत्रण मिळवल्याने कुठलीही जिवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. 

कोरोना आजार श्वसनाशी सर्वाधिक संबंधित असल्यामुळे पालिकेकडून दिवाळीत मोठे फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली होती. यादृष्टीने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार मुंबईभरात पालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. याला बहुतांशी नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत मोठे फटाके वाजवणे टाळले. दुकानदारांनीही मोठ्या फटाक्यांची विक्री केली नाही. परिणामी दरवर्षी दिवाळी दिवशी येणार्‍या 150 ते 200 फायर कॉलची संख्या 15 पर्यंत खाली आल्याचे प्रमुख अनिशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी सांगितले.  
मुंबईत कधी कुठली दुर्घटना घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान 24 तास अलर्टवर असतात. दिवाळीत आगीचे वाढते काॅल लक्षात घेता 

प्रत्येक कॉलमध्ये 5 ते 15 पर्यंत प्रमुख अग्निशमन अधिकारी तैनात ठेवण्यात येत आहेत. शिवाय अग्निशमन दल प्रमुख स्वत: फिल्डवर आणि वायरलेसद्वारे अधिकारी जवानांच्या संपर्कात राहत असल्यामुळे जवानांना बचावकार्य करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. परिणामी जीवित-वित्तहानी टळण्यासही मदत होत आहे. यावर्षीच्या दिवाळी दिवशीही अग्निशमन दलाचे तब्बल अडीच हजार कर्मचारी सुट्टी न घेता अहोरात्र कर्तव्यावर हजर होते. विशेष म्हणजे मुंबईकरांनीही पालिकेने घालून दिलेले नियम पाळून प्रशासनाला मोठे सहकार्य केल्याचेही काळे सांगितले.

फटाक्यांबाबत ट्रॉम्बे येथे  2 गुन्हे

 फटाके वाजवण्यास बंदी असताना फटाके वाजवल्या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ट्रॉम्बे पोलीस ठाणे येथे स्फोटक पदार्थ कायदा कलम 7 (2) अन्वये 02 गुन्हे नोंद करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले

Firecracker ban in Mumbai reduces fire incidents in mumbai 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com