Ambernath Firing: ठाण्यात बैलगाडी शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार; झाडल्या १५ ते २० गोळ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Firing at Ambernath thane over dispute during bullock cart race pandhari sheth phadke group

Ambernath Firing: ठाण्यात बैलगाडी शर्यतीच्या वादातून अंदाधुंद गोळीबार; झाडल्या १५ ते २० गोळ्या

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रविवारी बैलगाडी शर्यतीवरून दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

अंबरनाथ एमआयडीसीतील सुदामा हॉटेलजवळ गोळीबाराची घटना घडली . या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान यावेळी १५ ते २० गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

हेही वाचा: Maharashtra Politics: …तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील; लेकीला अनुसरून सुषमा अंधारेंची भावनिक पोस्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या एमआयडीसी परिसरात सायंकाळी झालेल्या या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान प्राथमिक तपासानुसार, अंबरनाथमधील एका गावात बैलगाडी शर्यती सुरू असताना ही घटना घडली, जिथे दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये हाणामारी झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर दोन गटातील सदस्यांनी नंतर एकमेकांवर गोळीबार केला, परंतु कोणीही जखमी झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: Pak Vs Eng: 'आम्ही हिशोब केल्याशिवाय….'; पराभवानंतर पाक पंतप्रधानांना भारताकडून चोख प्रत्युत्तर

टॅग्स :Thane