
बदलापूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानासमोरच गोळीबाराची घटना समोर आली आहे. त्यांच्या घरासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून ही हिंसक घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे.