अंधेरीतील पबमध्ये गोळीबार? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - मैत्रिणीने दिलेल्या वाढदिवसाच्या पार्टीत पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याची घटना रविवारी पहाटे अंधेरीतील पबमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये दिल्लीतील एक व्यावसायिक आणि त्याच्या चार अंगरक्षकांचा समावेश असून, त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे, तर सात जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अंधेरीच्या विरा देसाई रोडवर वुई व्हीआयपी हा पब आहे. रविवारी या पबमध्ये दिल्लीतील व्यावसायिक राकेश कालरा हे मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अंगरक्षकांसह आले होते. पहाटे उशिरापर्यंत ही पार्टी सुरू होती. राकेशच्या अंगरक्षकाकडील पिस्तुलातून अचानक चुकून गोळी सुटली. यात कुणीही जखमी झालेले नाही. या प्रकारामुळे काही वेळ पबमध्ये घबराटीचे वातावरण होते. त्यानंतर राकेश हा अंगरक्षकासह तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अंबोली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पबमध्ये पाहणी केली. त्यात पब व्यवस्थापनाने या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सहायक निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने राकेश आणि त्याच्या अंगरक्षकांना वाकोला येथून ताब्यात घेतले, तर पबमधील सात जणांना सोमवारी रात्री अटक केली. त्या सर्वांना अटक करून स्थानिक न्यायालयात हजर केले. 

आलिशान गाड्या, शस्त्रे जप्त 
तपासादरम्यान पोलिसांनी दोन महागड्या गाड्या, देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, 16 जिवंत काडतुसे, बारा एमएम पाईपगन, दोन रायफल, एक रिकामी पुंगळी जप्त केली आहे. या गुन्ह्यात चार जणांना पोलिसांनी "वॉण्टेड' दाखवले आहे. 

Web Title: Firing in Pub andheri news